Sunday, July 9, 2017

स्पर्धा परीक्षा- २

मार्गदर्शन
सामान्य परिस्थिती मधून असामान्य गोष्ट साधायची असल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे हा हमखास मार्ग आहे. आणि हे यश मिळवण्या साठी अभ्यासाबरोबरच योग्य मार्गदर्शन भेटणे ही तितकेच महत्वाचे असते.
तर हे मार्गदर्शनाची काही सोपी साधने आपण पाहुयात

१. यु ट्यूब-  साधारणत: आजकाल सर्वजण अभ्यासासाठी इंटरनेट वापरतात. जर कुणी वापरत नसेल तर आजच सुरवात करा. इंटरनेट वरील युट्युब हे सर्वाधिक लोकप्रिय विडीयो च्यानल आहे. त्यावर मनोरंजनाखेरीज माहिती आणि ज्ञानाचा खजिना आहे. इथेच आपण स्पर्धापरीक्षेसाठी  उपयोगी असणारे विडीयो पाहू शकतो. अनेक अनुभवी व्यक्ति आपले विडीयो इथे अपलोड करतात आणि आपल्यासाठी ते निशुल्क उपलब्ध असतात.

२. व्याख्याने (Seminar)- अनेक  शैक्षणिक सेवाभावी  संस्था स्पर्धापरीक्षेतील  यशस्वी लोकांची मोफत व्याख्याने आयोजित करतात. अशा व्याख्यानांमधून   खूप महत्वाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळू शकते.

३. सराव परीक्षा ( Test Series)- अभ्यास करत असतांना   आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही, याचे मूल्यमापन होणे गरजेचे असते. त्यासाठी काही शैक्षणिक संस्था  विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज (सराव परीक्षा ) आयोजित  करतात. अश्या काही चांगल्या टेस्ट सिरीज मधून आपले अवलोकन करून घेणे खूप फायदेशीर ठरते.

४. अभ्यासमाला ( Exercise Series/books )-  टेस्ट सिरीज प्रमाणेच एक्सर्साइज़ सिरीज देखील फायदेशीर ठरतात. स्पर्धापरीक्षांच्या बदलत्या स्वरूपानुसार प्रत्येक वर्षी नवनवीन नोट्स आणि पुस्तकाच्या स्वरुपात
अश्या अभ्यासमाला उपलब्ध असतात.

५. अभ्यास वर्ग (Classes)- पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाचे क्लासेस किंवा अकॅडमी आहेत. अश्या एखाद्या तज्ञ मार्गदर्शक असणारा क्लास लावणे देखील लाभदायक असते. परंतु असा क्लास निवडतांना तेथील शिक्षकांचा अनुभव, सुविधा आणि फी याची व्यवस्थित माहिती घ्यावी आणि नंतरच निर्णय घ्यावा.


No comments:

Post a Comment

तुझा सहवास

माझ्या अवतीभवती रोज खूप काही घडत असतं, तुझा सहवास मात्र मनात घर करून रहातो... तुझ्याशी जेंव्हा मी बोलतो, तेंव्हा मला बोलल्यासारखं वाटतं....