Thursday, April 23, 2015

जागतिक ग्रंथ दिन

पुस्तक दिनही असतो, हे मला माहित नव्हते... ऑफिस मधून येताना एफ एम वर ऐकले कि आज ' जागतिक ग्रंथ दिवस' आहे म्हणून....हे ऐकून माझ्यातला (झोपलेला) वाचक जागा झाला...!

 लहानपणी.... म्हणजे नोकरीला सुरवात करण्यापूर्वी मी एक चांगला वाचक होतो. नोकरीला लागल्यावर मला अचानक मोठे (प्रौढ) झाल्यासारखे वाटायला लागले. कौंटुंबिक जबाबदारी, नंतर लग्न, कामाचा व्याप या  सर्वांमध्ये माझ्यातला वाचक कुठे हरवला हे समजलेच नाही.

मागे वळून पाहता असे लक्षात आले की, मी लहान असतांना आज च्या सारखी भरमसाठ टीवी चानल्स, मोबईल, मॉल, सिनेमा गृहे किंवा इतर मनोरंजनाची साधने नव्हती ( निदान माझ्या आसपास तरी) त्यामुळे अभ्यास आणि खेळातून उरलेले वेळ घालविण्याचे उत्तम साधन म्हणजे वाचन... यातून माझी वाचनाची आवड तयार झाली.

पण आज तशी परीस्थिती नाही.. आज टी वी आणि इंटरनेट मुळे वेळ कुठे जातो ते कळतच  नाही. वीक एंड ला मॉल किंवा सिनेमा! पुस्तकाला हात लावायला वेळच नाही. त्यामुळे वाचन हळूहळू कमी होत गेले...!

पण मला वाटते वाचन करण्यासाठी कागदाचे, बायंडइंगवाले पुस्तकच पाहिजे असे काही नाही... आज आपण ई पुस्तके वाचू शकतो, इंटरनेट वर ब्लोग वाचू शकतो... मी तर म्हणतो, कालच्या पेक्षा आज जास्त संसाधने आहेत वाचन संकृती वाढविन्या साठी!

चला तर मग!




No comments:

Post a Comment

नवीन वर्ष आणि व्यायामाचा संकल्प

लवकरच २०१९ संपून २०२० हे नवीन वर्ष सुरु होणार आहे.  प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला अनेक संकल्प केले जातात. तया मधला सर्वात आवडीचा आणि दरवर्षी...