Saturday, June 17, 2017

स्पर्धा परीक्षा- १

कोणत्याही परीक्षेसाठी अभ्यासाला पर्याय नसतो. त्यात स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला ज्ञानाच्या पातळीबरोबरच आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हेही सिद्ध करावे लागते. स्पर्धा परीक्षेतील यश ही काही खूप अवघड किंवा अशक्य गोष्ट नाही. त्यासाठी फक्त काही मूलभूत गोष्टींचा अंगीकार करावा लागतो. मग यश तुमचेच!
चला तर मग बघू.... काय आहेत हे यशाचे मंत्र....

१.       इच्छा शक्ती

कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तुमच्या अंगी प्रचंड इच्छा शक्ती हवी. स्पर्धा परीक्षा याला अपवाद नाही. इतर कुणाचे तरी बघून किंवा पालकांच्या आग्रहा खातर स्पर्धेत उतरणे बरोबर नाही. तुम्ही मनातून, स्वत:च्या मर्जीने ठाम निर्णय घेतलेला हवा आणि तन-मन-धन पणाला लावण्याची तयारी हवी. कुठलीही गोष्ट एकदा स्वत:हून ठरवल्यावर पुढची वाटचाल सुकर होते.
  

२.        लक्ष्य

जर तुमच्याकडे काहीतरी करण्याची इच्छा शक्ती असेल तर तिला एक विशिष्ट ठिकाणी केंद्रित करणे  जरुरी असते. म्हणजे तुमच्या समोर ध्येय हवे, लक्ष्य हवे. प्रत्येक वर्षी अनेक स्पर्धा परीक्षा जाहीर होतात. पण अमुक अमुक परीक्षा मला अमुक अमुक वेळेत पार करायची आहे अशा प्रकारचे लक्ष्य निवडले पाहिजे.

३.       परिश्रम  

इच्छा शक्ती आहे आणि ध्येयही आहे. तर आता गरज आहे कृतीची. जो पर्यंत आपण ठरवलेल्या ध्येयाकडे वाटचाल करीत नाही तोवर ध्येय असून नसल्या सारखे आहे. यासाठी कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे, खूप अभ्यास करणे अपेक्षित आहे.

४.       मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षेच्या यशाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे योग्य मार्गदर्शन! तुमच्या परिश्रमाला अचूक दिशा देणे गरजेचे असते. आपल्या इच्छा शक्तीला ध्येयामध्ये परिवर्तीत करून केलेल्या परिश्रमाला योग्य मार्गदर्शन मिळणे, हीच येथील यशाची मुख्य किल्ली आहे.
आता हे मार्गदर्शन का व कसे मिळवायचे हे आपण पुढील पोस्ट मध्ये पाहू....!

नवीन वर्ष आणि व्यायामाचा संकल्प

लवकरच २०१९ संपून २०२० हे नवीन वर्ष सुरु होणार आहे.  प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला अनेक संकल्प केले जातात. तया मधला सर्वात आवडीचा आणि दरवर्षी...