Showing posts with label Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita. Show all posts

Sunday, February 18, 2018

तुझ्या प्रेमात न्हाउदे, मला बेभान होऊनी...


दूर आभाळात चढे, जेव्हा शुक्राची चांदणी..
भासे मला तू ग उभी, जशी माझ्या या अंगणी...

तू हसता गालात, चंद्र मोहरला नभी...
बरसली चांदरात, तुझ्या रुपात भिजुनी...

तुला समोर पाहता, उरी धडधड वाढे...
माझं घायाळ काळीज, तुझ्या नयन बाणांनी.....

तू जवळ येताच, भरे श्वासात सुगंध...
जाई-जुई मोगर्याची, जणू शाल पांघरुनी...

तुझ्या मैफिलीत जेव्हा, मी गायलो एकटा...
थरारले तुझे ओठ, माझ्या डोळ्यात पाहुनी...

आता सोसायच्या किती, तुझ्या फुलांच्या जखमा...
तुझ्या प्रेमात न्हाउदे,  मला बेभान होऊनी...

-   परशुराम महानोर


Wednesday, January 31, 2018

उरलेल्या जगण्याला, श्वासांची साठवण...!

उघडी कवाडे, अन , तुटलेल्या भिंती,
आजवर जपलेली, अदृश्य नाती,

थोडंसंच स्वप्न, तुटण्याच्या भीतीनं,
पापण्यांत ठेवलं, कधीच नाही पाहिलं,

थोडीशी आपुलकी, थोडासा विश्वास,
थोडासा त्रास, थोडाच राहिला प्रवास,

थोडीशीच उरलेली, तुझ्यातली तू,
अन थोडासाच उरलेला माझ्यातला मी,

थोडंसंच प्रेम, अन, थोडीशी आठवण,

उरलेल्या जगण्याला, श्वासांची साठवण...!

-परशुराम महानोर

Thursday, December 21, 2017

ती आज गोठली आहे



कोमेजल्या फुलांनी, ही प्रीत माळली आहे,
माझी अनंत स्वप्ने, मी आज जाळली आहे,

नव्हतो कधीच येथे,  मी भाग शर्यतीचा,
समजावूनी मनाला, मी हार टाळली आहे

आता नसे कशाची, ओढ ही जीवाला,
सोडून पावलांना, ही वाट चालली आहे,

सरता सरता ही सरेना, हा काळोख दाटलेला
निजवून मज उशाशी, ही रात जागली आहे.

            भिजवून आसवांनी, मोहरून सर्व काया,
ओल्या मिठीत माझ्या, ती आज गोठली आहे...!

-परशुराम महानोर

नवीन वर्ष आणि व्यायामाचा संकल्प

लवकरच २०१९ संपून २०२० हे नवीन वर्ष सुरु होणार आहे.  प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला अनेक संकल्प केले जातात. तया मधला सर्वात आवडीचा आणि दरवर्षी...