दूर आभाळात चढे, जेव्हा
शुक्राची चांदणी..
भासे मला तू ग उभी, जशी
माझ्या या अंगणी...
तू हसता गालात, चंद्र
मोहरला नभी...
बरसली चांदरात, तुझ्या
रुपात भिजुनी...
तुला समोर पाहता, उरी
धडधड वाढे...
माझं घायाळ काळीज,
तुझ्या नयन बाणांनी.....
तू जवळ येताच, भरे
श्वासात सुगंध...
जाई-जुई मोगर्याची, जणू
शाल पांघरुनी...
तुझ्या मैफिलीत जेव्हा,
मी गायलो एकटा...
थरारले तुझे ओठ, माझ्या
डोळ्यात पाहुनी...
आता सोसायच्या किती,
तुझ्या फुलांच्या जखमा...
तुझ्या प्रेमात न्हाउदे,
मला बेभान होऊनी...
- परशुराम महानोर
No comments:
Post a Comment