Saturday, March 10, 2018

स्वप्नातल्या परीची गोष्ट


तू स्वप्नात येतेस जेव्हा, रात्र लहान वाटू लागते...
तुझ्या नाजुक स्पर्शफुलांची, आठवण मनात दाटू लागते...

तू स्वप्नात येतेस जेव्हा, हळुवार वाहतो गार वारा....
तुझ्या सरकत्या पदराआडून, क्षितिजावरती तुटतो तारा...

तू स्वप्नात येतेस जेव्हा, उजळून जातो आसमंत असा....
तुझ्या रेशमी केसांवरती, जसा चमकतो चंद्र कवडसा...

तू स्वप्नात येतेस जेव्हा, स्वप्न न माझे स्वप्न राहते...
जागेपणीचे रुक्ष जगणे, क्षणात तुझ्यात विरून जाते...

तू स्वप्नात येतेस जेव्हा, शब्द चांदण्या बोलू लागती...
स्वप्नातल्या त्या परीची गोष्ट, पुन्हा एकदा सांगू लागती...
                     - परशुराम महानोर

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष आणि व्यायामाचा संकल्प

लवकरच २०१९ संपून २०२० हे नवीन वर्ष सुरु होणार आहे.  प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला अनेक संकल्प केले जातात. तया मधला सर्वात आवडीचा आणि दरवर्षी...