माझं प्रेम
श्रावण धारेत चिंब
भिजलं,
नितळ निळाईत न्हाहून
निघालं,
हिरव्या रानात, सोनेरी
उन्हात,
काठोकाठ भरून नकळत
सांडलं,
तुझ्या डोळ्यात नेहमीच
दिसलं,
माझ्यासाठी आणि फक्त माझ्याच
साठी,
पापण्यांच्या आड तू
जपून ठेवलं,
ओठांवर गोठलं, नजरेने
टिपलं,
जागेपणी स्वप्नांच्या
वेलीवर फुललं,
आठवणींच्या बागेत बहरून
आलं,
श्वासात माझ्या भरून
उरलं,
कोण म्हणतो, मी काहीच
नाही केलं,
तुझ्या या अबोल
प्रेमावर मी प्रेम केलं !
तुझ्या या अबोल
प्रेमावर मी प्रेम केलं !
- -परशुराम
महानोर.
No comments:
Post a Comment