लवकरच २०१९ संपून २०२० हे नवीन वर्ष सुरु होणार आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला अनेक संकल्प केले जातात. तया मधला सर्वात आवडीचा आणि दरवर्षी केला जाणारा संकल्प म्हणजे ' १ जानेवारीपासून व्यायाम... !' साधारणपणे हा संकल्प एक आठवडा, दोन आठवडे किंवा जास्तीत जास्त १ महिन्यापर्यंत चालतो.
मग हळू हळू आज नको उद्या, उद्या नको सोमवारी, सोमवारी नको, पुढच्या महिन्यात, असे करत व्यायामाचा संकल्प कधी हरवून जातो आणि वर्ष देखील संपून जाते हे कळत पण नाही.
हा अनुभव सरासरी सगळ्यांचाच असेल. बरेच जण तर जिम ची महागडी फी पण भरतात. ती पण एकदम वर्षभराची. काही जण नवीन सायकल घेतात. सायकली बरोबर हेल्मेट, ग्लोज आणि इतरही बराच खर्च करतात. पण शेवटी काय होते.? एक दोन महिने गेल्यावर जिम ची फी देखील वाया जाते आणि घरातल्या अडगळीत सायकलची अजून एक भर पडते.
मित्रांनो, आजकालच्या सुपरफास्ट जीवन शैलीमध्ये अन्न, पाणी, हवेइतकीच आपल्याला व्यायामाची गरज आहे. जसे या गोष्टी रोज आपल्या शरीराला आवश्यक आहेत, असाच व्यायाम देखील गरजेचा आहे. तोही रोजच्या रोज. प्रत्येकाच्या वयोमानानुसार, शरीरानुसार कोणताही असो, चालणे, धावणे, जिम अथवा सायकलिंग. कोणताही व्यायाम ना चुकता रोज करणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही १ जानेवारीच्या किंवा सोमवारच्या मुहूर्ताची गरज नाही. व्यायामाचा मुहूर्त हा आजच असतो आणि रोज असतो.
चला तर मग, आजच व्यायामाला सुरुवात करूयात! आणि येणाऱ्या नवीन वर्षात आपले शरीर अधिक आरोग्यदायी आणि अधिक बळकट बनवूयात......!
नववर्षाभिनंदन!